- शब्दाच्या आठ जाती आहेत त्यात विकारी आणि अविकारी असे दोन प्रकार पडतात. त्यातीलच विकारी या प्रकारातील नाम ही एक शब्दाची जात आहे.
- वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना नाम असे म्हणतात.
- वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तु ज्या शब्दांनी बोधित होतात, त्या शब्दांना नाम असे म्हणतात.
1) सामान्यनाम :
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्यनाम असे म्हणतात. सामान्य नाम ही त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाम आहे.
- सामान्यनाम हे जातिवाचक असते.
- सामान्यनाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंत असलेल्या समान गुणधर्माला दिलेले नाव असते.
उदा. : मुलगा, मुलगी, शाळा, घर, ग्रह, शहर, मंदिर, इतर
(अ) मुलगा उभा आहे. ( या वाक्यात मुलगा ही सामान्य नाम आहे)
(आ) पुस्तक छान आहे. ( या वाक्यात पुस्तक ही सामान्य नाम आहे.)
सामान्यनामाचे दोन प्रकार पडतात : समुदायवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम.
समुदायवाचक नाम :
समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाच्या दिलेल्या नावाला समुदायवाचक नाम असे म्हणतात.
उदा. कळप, वर्ग, ढिगारा.
(अ) यांच्या वर्गातील सर्व मुळे खूप हुशार आहेत. ( या वाक्यात वर्गातील हे समुदायवाचक नाम आहे,)
(आ) जंगलातून हरणांचा एक मोठा कळप जात होता. ( या वाक्यात कळप हे समुदायवाचक नाम आहे.)
पदार्थवाचक नाम :
जे घटक शक्यतो लिटर, मीटर, किंवा किलोग्रॅम मध्ये मोजले जातात किंवा संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात.
उदा. : सोने, तांबे, दूध, साखर, कापड, इतर
(अ) माझ्या आईला सोनेचे दागिने खूप आवडतात. ( या वाक्यात सोने हे पदार्थवाचक नाम आहे.)
(आ) डब्यात दोन लीटर दूध आहे. ( या वाक्यात दूध हे पदार्थवाचक नाम आहे.)
(2) विशेष नाम :
ज्या नामाने जातीचा बोध होत असून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा , प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्यास विशेषनाम असे म्हणतात.
- विशेषनाम हे एकवचनी असते.
- विशेषनाम हे व्यक्तीवाचक असते.
- विशेषनाम हे त्या व्यक्तीच्या अथवा वस्तूचे स्वतःचे नाव असते .
उदा. : भारत, पृथ्वी, हिमालय
(अ) पुढच्या सोमवारी मी मुंबईला जाणार आहे. ( या वाक्यात सोमवारी हे विशेषनाम आहे.)
(आ) हिमालय खूप सुंदर आहे. ( या वाक्यात हिमालय हे विशेषनाम आहे.)
(3) भाववचक किंवा धर्मवाचक नाम :
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात.
ही नामे सामान्यतः 'त्व', 'पण', 'आई', 'गिरी', 'पणा', 'की', 'ई', 'ता', 'य' असे प्रत्यय लागून तयार होतात.
उदा. : कीर्ती, गुलामगिरी,
(अ) ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. ( या वाक्यात सौंदर्य हे भाववाचक नाम आहे.)
हे पण वाचा : शब्दांच्या जाती मराठी व्याकरण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा