रोजी
शब्दांच्या जाती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार होय. वाक्यात जी काही शब्द येतात त्यांची प्रत्येकाचे कार्य हे वेगवेगळे असते. त्या शब्दांच्या कार्यांवरून त्यांना वेगवेगळी नाब्वे देण्यात आलेली आहेत. शब्दांचे असे आठ प्रकार आहेत त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात. बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात. शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो. तर क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवलप्रयोगी अव्यय ही चार अविकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही.
विकारी व अविकारी यांना अनुक्रमे सव्यय व अव्यय असे म्हणतात.
1) नाम :
वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना नाम असे म्हणतात.
उदा. झाड, फुल कृष्णा, नदी
(अ) मला पुस्तक आवडते. (या वाक्यात पुस्तक हे नाम आहे.)
(आ) तो झाड लावतो. (या वाक्यात झाड हे नाम आहे.)
नामांचे प्रकार : सामान्य नाम, विशेषनाम, भाववाचक नाम, समुदायवाचक नाम, पदार्थवाचक नाम.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा : नाम व नामाचे प्रकार
2) सर्वनामे :
जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात, त्यांना सर्वनामे म्हणतात.
उदा : मी, तू, हा, जो, कोण, इतर
(अ) मी बाजारात गेलो. ( या वाक्यात मी हे सर्वनाम आहे.)
(आ) तू मला आधी का सांगितले नाहीस ? ( या वाक्यात तू हे सर्वनाम आहे.)
सर्वनामांचे प्रकार : पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम.
3) विशेषण :
जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात, त्यांना विशेषण असे म्हणतात.
उदा. : चांगली, काळा, दोन
(अ) तिथे दहा मुले होती. (या वाक्यात दहा हे विशेषण आह.)
विशेषणांचे प्रकार : गुणविशेषण, संख्याविशेषण, सार्वनामिक विशेषण.
4) क्रियापद :
जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापदे असे म्हणतात.
उदा. : येते, देते, करतो,
(अ) मी रोज शाळेत जातो. (या वाक्यात जातो हे क्रियापद आहे.)
(आ) मुलांनी खरे बोलावे. (या वाक्यात बोलावे हे क्रियापद आहे.)
क्रियापदांचे प्रकार : सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद.
5) क्रियाविशेषण अव्यय :
जे शब्द क्रीयापादाबद्दल अधिकचीमाहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा. : दरोरोज, काल, वारंवार सर्वत्र
(अ) परमेश्वर सर्वत्र असतो. (या वाक्यात सर्वत्र हे क्रियाविशेषण अव्यय आहे.)
(आ) मी दरोरोज शाळेत जातो. ( या वाक्यात दरोरोज हे क्रियाविशेषण अव्यय आहे.)
क्रियाविशेषणाचे प्रकार : कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय, निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय.
6) शब्दयोगी अव्यय :
जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : वर, खाली, बाहेर, पासून
(अ) तो झाडावर चढला. ( या वाक्यात झाडावर या शब्दामधील वर हे शब्दयोगी अव्यय आहे.)
(आ) त्याच्याकडून हे काम होणार नाही. ( या वाक्यात त्याच्याकाडून या शब्दातील कडून हे शब्दयोगी अव्यय आहे.)
शब्दयोगी अव्यायंचे प्रकार : स्थलवाचक, कालवाचक, करणवाचक, हेतुवाचक, व्याक्तीरेकवाचक, तुलनावाचक, योग्यतावाचक, कैवल्यवाचक, संग्रहवाचक, संबंधवाचक , सहचर्यवाचक , भागवाचक, विनिमयवाचक, विरोधवाचक, परिणामवाचक.
7) उभयान्वयी अव्यय :
जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात, त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. : आणि , पण, म्हणून
(अ) ऋतुजा ने उत्तम भाषण केले ; म्हणून तिला बक्षीस मिळाले. ( या वाक्यात म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे.)
(आ) एक रुपया म्हणजे शंभर पैसे. ( या वाक्यात म्हणजे हे उभयान्वयी अव्यय आहे.)
उभायान्वयी अव्यायांचे प्रकार : प्रधानत्वसुचक उभायान्वाच्यी अव्यय, गौणत्वसुचक उभयान्वयी अव्यय
8) केवलप्रयोगी अव्यय :
जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : अरेरे ! , शाब्बास !
(अ) शाब्बास ! आराध्य चांगले यश मिळवले. ( या वाक्यात शाब्बास ! हे केवलप्रयोगी अव्यय आहे.)
(आ) बाप रे ! किती मोठा साप आहे तो. ( या वाक्यात बाप रे ! हे केवलप्रयोगी अव्यय आहे.)
केवलप्रयोगी अव्यायंचे प्रकार : हर्षदर्शक, शोकदर्शक, अश्चर्यकारक, प्रशंसादर्शक , संमतिदर्शक, विरोधीदर्शक, तिरस्कारदर्शक, संबोधनदर्शक, मौनदर्शक
वाक्यात येणाऱ्या शब्दांचे असे आठ प्रकार आहेत. त्यांनाच आपण शब्दांच्या आठ जाती असे म्हणतो शब्दांच्या आठ जाती म्हणजेच शब्दांची आठ कार्ये होय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा